एक्स्प्लोर
Kanhaiya Kumar Joins Congress: कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचे स्वागत करताना राहुल गांधी काय म्हणाले?
कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी
1/9

Kanhaiya Kumar Joins Congress: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, तिन्ही नेते दिल्ली येथील आयटीओ येथे शहीद भगतसिंग पार्कमध्ये जाऊन शहीद-ए-आझम भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
2/9

या तरुण नेत्यांसोबत एक फोटो शेअर करताना राहुल गांधी यांनी ट्वीट केले, "खोट्याच्या राज्यात सत्यानेच क्रांती येते. या सत्याग्रहात सर्व नवीन आणि जुन्या साथीदारांना एकत्र सहभागी व्हावे लागेल. #BhagatSingh"
3/9

त्यानंतर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी राहुल गांधींसह काँग्रेस कार्यालय गाठले. येथे कन्हैया कुमार यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. कन्हैया यांनी राहुल गांधींना महात्मा गांधी, भीमराव आंबेडकर आणि भगतसिंग यांची फ्रेम भेट दिली.
4/9

तर जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांना संविधानाची प्रत भेट केली. मेवानी म्हणाले, “कायदेशीर कारणांमुळे मी औपचारिकपणे काँग्रेसमध्ये सामील होऊ शकलो नाही. मी एक स्वतंत्र आमदार आहे, जर मी कोणत्याही पक्षात सामील झालो, तर मी आमदार म्हणून राहू शकत नाही... मी वैचारिकदृष्ट्या काँग्रेसचा भाग आहे, आगामी गुजरात निवडणूक काँग्रेसच्या चिन्हासह लढेल."
5/9

यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. वेणुगोपाल म्हणाले, "कन्हैया कुमार हे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यांच्या सामील होण्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. जिग्नेश जी यांचा सहभाग पक्षाला बळकट करेल."
6/9

कन्हैया कुमार म्हणाले की, कोट्यवधी तरुणांना असे वाटू लागले आहे की जर काँग्रेस टिकली नाही तर देशही टिकणार नाही आणि अशा परिस्थितीत ते लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की, देशात केवळ वैचारिक संघर्षाचे नेतृत्व काँग्रेसच करू शकते.
7/9

जिग्नेश म्हणाले की, देशातील तरुणांना आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांना एकत्र लढावे लागेल. कारण देशाला आतापर्यंतच्या सर्वात अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे.
8/9

मूळचे बिहारचे असलेले कन्हैयाकुमार कथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली जेएनयूमध्ये अटक झाल्यानंतर प्रकाशझोतात आले. कन्हैया यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात सीपीआय उमेदवार म्हणून बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
9/9

दलित समाजातील जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.
Published at : 28 Sep 2021 10:27 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















