एक्स्प्लोर
त्यांची माफी कशी मागू, माझ्याकडे शब्द नाहीत; विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले, सभागृह स्तब्ध
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काळजाला हात घालणारं भाषण केलं.
Omar abdullah break down in Jammu and kashmir vidhansabha
1/8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काळजाला हात घालणारं भाषण केलं.
2/8

केवळ हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं आलोय, असे अब्दुल्ला यांनी म्हटले.
3/8

उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिमपर्यंत संपूर्ण देश या हल्ल्याने व्यथित झाला आहे. यापूर्वीही अनेक हल्ले झाले आहेत, अमरनाथ यात्रा, काश्मीरी पंडित, सरदार बस्तीया येथेही हल्ले झाले आहेत. मात्र, 21 वर्षानंतर एवढा मोठा हल्ला काश्मीरमध्ये झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले.
4/8

मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री या नात्याने आपण पर्यटकांना निमंत्रण दिले होते. आलेल्या पाहुण्यांना, पर्यटकांना सुखरुप येथून पाठविण्याची जबाबदारी माझी होती. पण, नाही पाठवू शकलो.
5/8

माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलू त्यांना, त्या लहान मुलांना, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं.
6/8

त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवा पत्नीला काय बोलू, जिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं, असे भावनिक उद्गार ओमर अब्दुल्लांनी सभागृहात काढले.
7/8

मला काही लोकांनी विचारलं की आमची काय चूक होती? काही दिवसांपूर्वीच आम्ही इथं फिरायला आलो होतो. पहिल्यांदाच आम्ही काश्मीरला सुट्टी घालवायला आलो होतो. पण, आता आयुष्यभर ही सुट्टी आम्हाला दु:खद आठवण देत राहणार आहे.
8/8

या हल्ल्याने आपण आतून खचून गेलोय, अशा शब्दात ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
Published at : 28 Apr 2025 03:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























