एक्स्प्लोर
ASTRA BVR missile test : बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्र म्हणजे काय?
ASTRA BVR missile test : बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्र म्हणजे काय?
ASTRA BVR missile test
1/10

भारतीय बनावटीच्या आणि नजरेपलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे (PTI PHOTO)
2/10

सुमारे 20,000 फूट उंचीवरून या क्षेपणास्त्राची विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (PTI PHOTO)
3/10

'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात ही चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने भारतील हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे. (PC : Wikipedia)
4/10

क्षेपणास्त्र विमानातून सुमारे 20,000 फूट उंचीवरून लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर 'ASTRA' या क्षेपणास्त्राच्या पलीकडे व्हिज्युअल रेंजच्या हवेतून हवेत मारा करण्यात आली. (PTI PHOTO)
5/10

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), डीआरडीओ (DRDO) आणि इतर विभागांशी समन्वय साधून एचएएलने हे यश मिळविले आहे. (PTI PHOTO)
6/10

या यशस्वी चाचणीमुळे ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेलाही बळ मिळाले आहे. या विमानाचे परीक्षण दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानाने केले. (PTI PHOTO)
7/10

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (beyond-visual-range missile - BVR) म्हणजे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा प्रकार आहे. ही क्षेपणास्त्रे साधारणपणे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडील म्हणजे 20 नॉटिकल मैल (nmi) किंवा किलोमीटरच्या भाषेत 37 किलोमीटर अंतराच्या पलीकडील लक्ष्य भेदण्यात सक्षम असतात. (PTI PHOTO)
8/10

या प्रकारातील क्षेपणास्त्रांमध्ये असलेल्या ड्युअल पल्स रॉकेट मोटर (dual pulse rocket motors) किंवा बूस्टर रॉकेट मोटरच्या साहाय्याने त्यांना एवढ्या दूरवरील अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम केलं जातं. (PTI PHOTO)
9/10

अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेसोबतच या बीव्हीआर क्षेपणास्त्रे त्यांच्यासाठी आधीच निश्चित केलेलं लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सक्षम असतात. (PTI PHOTO)
10/10

तसंच या क्षेपणास्त्रांमध्ये अतिशय दूर अंतरावरील लक्ष्य विमानातून निश्चित करण्याची यंत्रणाही कार्यान्वित आहे. तसंच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या लक्ष्याने आपलं स्थान बदललं तरीही ही क्षेपणास्त्रे बदललेल्या स्थानावरील लक्ष्याचा (mid-course correction) वेध घेण्यात सक्षम आहेत. (PTI PHOTO)
Published at : 24 Aug 2023 01:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























