एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात
Chhatrapati Sambhaji Nagar News: रामनवमीच्या (Ram Navmi 2023) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.

Photo : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात
1/10

पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
2/10

शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
3/10

रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.
4/10

पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस (Aurangabad Police) जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
5/10

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.
6/10

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं, यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर काही तरुणांनी गोंधळ घातला असून, मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली.
7/10

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
8/10

तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पेटलेल्या वाहनांवर पाण्याचा फवारे मारून आग विझवली.
9/10

सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
10/10

तर आज सकाळी राम मंदिरात नेहमीप्रमाणे पूजापाठ सुरु असून, भाविक देखील दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे.
Published at : 30 Mar 2023 10:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
