एक्स्प्लोर
Swachhata Hi Seva : हातात झाडू घेऊन मंत्री सावे उतरले रस्त्यावर, स्वच्छता मोहीमेत नोंदवला सहभाग
Swachhata Hi Seva : देशभरात आज ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून, राज्यात देखील अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Atul Save participation in Swachhata Hi Seva campaign
1/8

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान अंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, पुंडलिक नगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतुल सावे उपस्थित होते.
2/8

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक भागात देखील आज मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
3/8

राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत देखील शहरातील अनेक भागात अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
4/8

यावेळी अतुल सावे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, महानगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी यामध्ये अतिशय उत्साहात सहभाग नोंदवला.
5/8

तसेच,‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत पीएफ ऑफिस तर्फे एन-2 मैदान परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
6/8

याप्रसंगी पीएफ कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात ही मोहीम संपन्न झाली.
7/8

सोबतच, ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत शहरातील सिडको बसस्थानक परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
8/8

या अभियानात स्थानिक नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.सोबतच यावेळी मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
Published at : 01 Oct 2023 05:51 PM (IST)
आणखी पाहा























