एक्स्प्लोर
Photo News : औरंगाबाद जिल्ह्यात आजही ठिकठिकाणी आंदोलन; पाहा फोटो
Aurangabad : जालना येथील घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात देखील दुसऱ्या दिवशी या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहे.

Aurangabad News
1/12

औरंगाबाद जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. तर कुठे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर पेटवून जालना येथील घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
2/12

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे.
3/12

दरम्यान आज देखील औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
4/12

आज औरंगाबाद जिल्ह्यात कोठे बाजारपेठ तर कुठे गाव बंदची हाक देण्यात आली आहे. (छायाचित्र :सिद्धार्थ वाहुले)
5/12

पैठण तालुक्यातील बिडकीन गावात आज बंदची हाक देण्यात आली असून, रस्ता रोको करण्यात आला आहे.
6/12

पाचोडमध्ये आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत असून, दुकाने बंद असल्याचे दिसून येत आहे. (छायाचित्र :सिद्धार्थ वाहुले)
7/12

तर पाचोड आठवडी बाजारात देखील आज एकही दुकान लागलेली नाही. त्यामुळे बाजार तळ परिसरात शुकशुकाट आहे. (छायाचित्र :सिद्धार्थ वाहुले)
8/12

तर पैठण शहरात देखील आज सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून, पैठण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
9/12

कन्नड तालुक्यातील पिशोरमध्ये मराठा आरक्षणच्या मागणीसाठी आणि जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे रस्ता रोको करण्यात आला आहे.
10/12

कन्नड तालुक्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती असून, अनेक गावात आज बंदची हाक देण्यात आली आहे.
11/12

तर सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात देखील आज सकाळपासून बंद पाहायला मिळत आहे.
12/12

पैठण तालुक्यातील नांदर येथे मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून गाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच यावेळी जालना येथील घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
Published at : 03 Sep 2023 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
