एक्स्प्लोर
धीर सोडू नका! आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी
औरंगाबाद : उद्या मंत्री मंडळाची बैठक होणार असून, त्यापूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.
Aditya Thackeray
1/9

पावसाने पाठ फिरवल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाहणी केली.
2/9

यावेळी आदित्य ठाकरेंनी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
3/9

शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या. तर, “धीर सोडू नका, आम्ही अहो तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू.” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
4/9

आदित्य ठाकरेंनी आपल्या पाहणीची सुरवात पैठण तालुक्यातील निपाणी गावापासून केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
5/9

यावेळी त्यांनी वृद्ध शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाची आणि पिकांची सध्याची परिस्थिती जाणून घेतली.
6/9

यावेळी त्यांनी मका, कापूस, टोमॅटो, मोसंबी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत बांधावर जाऊन भेट घेतली.
7/9

आदित्य ठाकरेंनी जिल्ह्यातील निपाणी, लोहगाव, गुरू धानोरा, मुद्देश वाडगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.
8/9

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.
9/9

दरम्यान याच दौऱ्यात त्यांनी बिडकीन गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट देखील घेतली.
Published at : 15 Sep 2023 05:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























