एक्स्प्लोर
पाण्यासोबत रस्त्यावरही धावते 'ही' कार, फीचर्सही आहेत दमदार

Amphibious Car
1/6

आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त गाड्या बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि रस्ते दोन्हीवर धावते. या कारचे नाव आहे 'सी लायन' (Sea Lion). 'सी लायन'ने जगातील सर्वात वेगवान Amphibious Car म्हणून आपले नाव नोंदवले आहे. ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया या कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत.
2/6

या कारचे निर्माते एम. विट (M. Witt) यांनी ती फॅन्टसी व्हेंचर्समध्ये विक्रीसाठी ठेवली आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला 25,9500 डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपये) खर्च करावे लागतील.
3/6

एका रिपोर्टनुसार, ही कार अवघ्या काही मिनिटांत कारमधून बोटीत बदलते. तुम्ही ही कार रस्त्यावरून आणि पाण्यात घेऊन जाऊ शकता आणि वाहतुकीच्या दोन्ही पद्धतींचा आनंद घेऊ शकता.
4/6

स्टेनलेस स्टील कवर्ड Mazda 13B रोटरी इंजिनच्या मदतीने ही कारला पाण्यावर 60 mph (97 किमी) वेगाने धावते. तर रस्त्यावर ताशी 290 किमीचा वेग धरू शकते.
5/6

ही कार बनवण्यासाठी डिझायनर M.Witt यांना सुमारे 6 वर्षे लागली. या कारची बॉडी सीएनसी माइल्ड पीस आणि टीआयजी वेल्डेड 5052 अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे. यामुळे ही Amphibious Car खूपच वेगळी आणि नेत्रदीपक दिसते.
6/6

'सी लायन' कार ही जागतिक वेगाच्या विक्रम स्पर्धेत प्रमुख स्पर्धक आहे. याची स्पर्धा सुमारे 25 अन्य वाहनांशी आहे. या कारचा डिझायनर मार्क विट फॅन्टसी व्हेंचर्सच्या माध्यमातून याची ऑनलाइन विक्री करत आहे. 'सी लायन' कारमध्ये आवश्यक ती सर्व फीचर्स आहेत, ज्यामुळे ती चालवताना कोणतीही अडचण येत नाही. त्याचा समतोल पाण्यातही राहतो.
Published at : 01 Jul 2022 09:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
