एक्स्प्लोर
एमजी ग्लोस्टर भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

MG Gloster 2022 Launched
1/10

नवीन MG Gloster भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 31.99 लाख रुपये आहे. नवीन एमजी ग्लोस्टर नवीन स्टाइलिंग, सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानासह आणण्यात आली आहे.
2/10

ही तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात अली आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 40.77 लाख रुपये आहे आणि ही SUV 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
3/10

2022 MG Gloster च्या बाह्य भागामध्ये काही सामान्य बदल करण्यात आले आहेत. याच्या डिझाईन अपडेटबद्दल बोलायचे झाले तर यात नवीन डिझाइन केलेले ड्युअल-स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
4/10

तसेच या एसयूव्हीमध्ये नवीन रंगाचा पर्याय डीप गोल्डन रंगाचा पर्याय जोडण्यात आला आहे. याशिवाय ही ग्लोस्टर एसयूव्ही मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वॉर्म व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
5/10

image 5
6/10

यासोबतच 12 स्पीकर उच्च दर्जाची ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे. यात 75 कनेक्टेड कार फीचर्स आहेत. नवीन आय-स्मार्ट इंटेलिजेंट सिस्टम ग्राहकांना त्यांच्या वाहनावर लक्ष ठेवण्यास मदत करेल.
7/10

ग्लोस्टरला प्रगत VR प्रणाली देखील मिळते. I-Smart चे हे एक खास फीचर्स आहे. जे सनरूफ, AC, म्युसिक आणि नेव्हिगेशनसह 35 हून अधिक हिंग्लिश कमांड नियंत्रित करण्यासाठी 100 हून अधिक कमांडस सपोर्ट करते. कंपनीने ते 2 व्हील ड्राइव्ह आणि 4 व्हील ड्राइव्हसह 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध केले आहे.
8/10

यात 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 212 hp ची पॉवर जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
9/10

फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यात 7 टेरेन मोड, ड्युअल पॅनोरॅमिक इलेक्ट्रिक सनरूफ, 12-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्रायव्हर सीट मसाज आणि व्हेंटिलेशन फीचर आणि वायरलेस चार्जिंग आहे.
10/10

यामध्ये दरवाजा उघडण्याची वॉर्निंग, मागील क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, लेन चेंज असिस्टसह 30 स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.
Published at : 31 Aug 2022 11:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
