एक्स्प्लोर
Maruti Suzuki Ciaz आधीपेक्षा अधिक सेफ आणि दमदार, जाणून घ्या कशी आहे ही अपडेटड कार
Maruti Suzuki Ciaz
1/7

दिग्गज कार निर्माता ब्रँड कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) त्याच्या Nexa डीलरशिपच्या माध्यमातून विकली जाणारी सेडान कार 2023 Ciaz एका नवीन ड्युअल-टोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे.
2/7

त्याच्या टॉप-स्पेक अल्फा व्हेरियंटच्या ड्युअल-टोन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 11.15 लाख रुपये आहे. तर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 12.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन कारमध्ये आणखी कोणकोणती अपडेटेड वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत ती पाहूया. नवीन सियाझ कारमध्ये काणते बदल झाले?
3/7

नवीन सियाझ (Maruti Suzuki Ciaz) कारमध्ये तीन ड्युअल-टोन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये ब्लॅक रुफच्या बरोबरच पर्ल मॅटेलिक ओपुलेंट रेड, ब्लॅक रुफ आणि पर्ल मॅटेलिक ग्रे तसेच ब्लॅक रुफ बरोबरच डिग्निटी ब्राऊन या कलरचा समावेश आहे.
4/7

2023 मारुती सियाझमध्ये आता आणखी अपडेटेड सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, ड्युअल एअरबॅग, ISOFIX चाईल्ड सीट अँकरेज आणि रियर पार्किंग सेंसर देण्यात आलं आहेत.
5/7

मारुती सुझुकी सियाझमध्ये 1.5L, K15B पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळतं. या कारची लांबी 4,490 mm, रुंदी 1,730 mm आणि उंची 1,480 mm आहे. यामध्ये 2,650 mm चा व्हिलबेस देण्यात आला आहे.
6/7

नवीन सियाझ लॉन्च करण्याच्या मुहूर्तावर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी मार्केटिंग आणि सेल्स, शशांक श्रीवास्तव म्हणाले की, आम्हाला नवीन सियाझ कारचा लॉन्च करण्यात भरपूर आनंद झाला आहे. यामध्ये तीन नवीन ड्युल टोन कलर ऑप्शन आणि अधिक अपडेटेड फिचर्स देण्यात आले आहेत.
7/7

सियाझ ग्राहकांची आवडती कार आहे. यामध्ये आम्ही यशस्वीरित्या आठ वर्ष पूर्ण केली आहेत. आता या नवीन कारच्या अपडेटसह प्रीमियम मिड-साईझ सेडान सेगमेंटमध्ये आमचं स्थान अधिक मजबूत करण्याचं ध्येय आहे.
Published at : 16 Feb 2023 10:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















