एक्स्प्लोर
125 सेगमेंटमध्ये 'या' स्कूटर आहेत बेस्ट, कमी किंमतीत मिळणार बेस्ट फीचर्स
TVS NTORQ 125
1/6

या यादीतील पहिली स्कूटर आहे Suzuki Access 125. यामध्ये फॅमिली स्कूटरला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. ही स्कूटर आता आणखी फीचर्स आणि मायलेजसह BS6 अपडेटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.
2/6

यात 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 6,750 rpm वर 8.6 bhp आणि 5,500 rpm वर 10 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. याची किंमत 75,024 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
3/6

यादीतील दुसरी स्कूटर Honda ActiVA 125 आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. यातील इंजिन फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानासह येते. यात 124cc सिंगल सिलेंडर क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे.
4/6

ड्रायव्हिंग आरामदायी करण्यासाठी याच्या इंजिनमध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) वापरण्यात आले आहे. याचे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, याची किंमत 75,761 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
5/6

या यादीतील तिसरी स्कूटर TVS NTORQ 125 आहे. ही खूप चांगल्या फीचर्ससह येते. सर्वात महत्त्वाच्या फीचर्समध्ये याच्या ड्युअल-स्क्रीन सेटअपचा समावेश आहे, ज्यामध्ये एलसीडी आणि टीएफटी स्क्रीन आहे. यासोबतच कंपनीची पेटंट TVS SmartXonnect सिस्टीम देखील यामध्ये आहे.
6/6

जी ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट करता येते. SmartXTalk आणि SmartXTrack सारखे फीचर्सही स्कूटरमध्ये पाहायला मिळतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत 82,592 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Published at : 26 Jun 2022 11:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण























