एक्स्प्लोर
हार्ले-डेविडसनची सर्वात स्वस्त बाईक! दमदार Harley Davidson X440 लाँच, किंमत आणि खासियत माहितीय?
Harley Davidson X440 : हार्ले-डेविडसनची सर्वात स्वस्त बाईक लाँच झाली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी नवीन हार्ले डेव्हिडसन बाईक लाँच झाली आहे.
Harley Davidson X440 | Cheapest Harley Davidson Bike
1/9

हार्ले-डेव्हिडसनची बहुप्रतिक्षित सर्वात स्वस्त बाइक Harley-Davidson X440 भारतात लाँच करण्यात आली आहे. (PC:Google)
2/9

या बाईकची सुरुवातीची किंमत 2.29 लाख रुपये आहे. Harley-Davidson X440 ची स्पर्धा Royal Enfield Classic 350 आणि Honda H'ness CB350 शी होईल. (PC:Google)
3/9

हार्ले-डेव्हिडसन कंपनीची ही पहिली मेड-इन-इंडिया बाईक आहे, जी Hero MotoCorp ने बनवली आहे.(PC:Bikewale)
4/9

हार्ले डेव्हिडसन कंपनीने ही बाईक फक्त 2.29 लाख रुपयांच्या किंमतीपासून लाँच केली आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत 2.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. (PC:Bikewale)
5/9

बाइक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते, यासाठी तुम्हाला 25,000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल. (PC:Bikewale)
6/9

हार्ले डेव्हिडसनने बनवलेली ही सर्वात स्वस्त बाईक आहे, जी पूर्णपणे मेड-इन इंडिया बनलेली आहे. (PC:Google)
7/9

Harley-Davidson X440 चं स्टाइलिंग आणि डिझायनिंग Harley-Davidson ने केलं आहे, तर बाईक बनवण्याचं काम हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने केलं आहे. (PC:Google)
8/9

Harley-Davidson ची ही पहिली बाईक आहे, जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. याशिवाय, हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या भागीदारीत तयार केलेलं हे पहिलं मॉडेल आहे.(PC:Google)
9/9

Harley-Davidson X440 बाईकचा लूक खूपच स्पोर्टी आहे. ही बाईक क्रूझरप्रमाणे कोणत्याही फॉरवर्ड-सेट फूटपेगशिवाय किंवा स्वीप्ट बॅक हँडलबारशिवाय ऑफर केली जाते. या बाइकमध्ये मिड-सेट फूटपेग आणि फ्लॅट हँडलबार दिला आहे. (PC:Google)
Published at : 04 Jul 2023 10:01 AM (IST)
आणखी पाहा























