एक्स्प्लोर
Car Insurance : कार विमा खरेदी करताय? 'या 'टिप्सने तुमचा प्रीमियम होईल कमी!
Car Insurance : काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या कारचा प्रीमियम कमी होऊ शकतो.
Car Insurance : कार विमा खरेदी करताय? 'या 'टिप्सने तुमचा प्रीमियम होईल कमी!
1/11

प्रत्येक कार मालकाचा कमी प्रीमियम दरात चांगला विमा खरेदी करण्याकडे कटाक्ष असतो. त्यासाठी काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
2/11

जर तुम्ही एका वर्षात विमा पॉलिसी क्लेम केला नाही तर तुम्हाला No Claim Bonus चा फायदा मिळू शकतो.
3/11

पहिल्या वर्षी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत हा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपयांचा प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला No Claim Bonus म्हणून 1000 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
4/11

ज्या व्यक्ती आपल्या कारचा वापर कमी प्रमाणात करतात त्यांच्यासाठी Pay As You Drive हा विमा चांगला ठरू शकतो.
5/11

यामुळे तुम्हाला कमी प्रीमियम द्यावा लागू शकतो.
6/11

Pay As You Drive या प्रकाराचा विमा तुम्ही किती किलोमीटर कार चालवता यावर अवलंबून आहे.
7/11

ज्या कार 15 हजार किलोमीटरपेक्षा कमी धावल्या आहेत. त्यांना याचा फायदा मिळतो.
8/11

कोणताही विमा खरेदी केल्यानंतर त्याची वैध मुदत तारीख पाहून घ्या.
9/11

वेळेत विमा नुतनीकरण न केल्यास तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो.
10/11

त्यामुळे सात दिवस आधी विमा नुतनीकरण करून घ्यावे.
11/11

कार विमा खरेदी केल्यानंतर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर विमा दावा करणे टाळावे. कमी खर्च असणारे विमा दावा केल्याने तुम्हाला No Claim Bonus चा लाभ मिळणार नाही.
Published at : 09 Sep 2022 05:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























