एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंसाठी कायपण! मुलाखत ऐकण्यासाठी मिलिंद नार्वेकर जमिनीवर बसले
1/7

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरु असताना त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर खाली बसून मुलाखत ऐकत होते.
2/7

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे आपल्या निवास्थानावरून लाईव्ह या कार्यंक्रमात सहभागी झाले होते.
3/7

मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे.
4/7

1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकरांनी मातोश्री गाठली.
5/7

एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले.
6/7

हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा नार्वेकरांमधील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद नार्वेकरांना पटकन उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते.
7/7

तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. साधारण 1994 सालच्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























