एक्स्प्लोर
Women Safety: महिलांच्या बॅगेत नेहमी असावे 'हे' सेफ्टी टूल्स; सुरक्षेसाठी आहेत उपयुक्त
Women Safety: नोकरदार महिलांना कधीकधी ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो. रात्री उशिरा घरी येताना बऱ्याचदा सुरक्षेची चिंता असते, अशा वेळी महिलांनी काही सेफ्टी टूल्स सोबत बाळगणं महत्त्वाचं आहे
Women Safety Tools
1/6

महिलांनी त्यांच्या पर्समध्ये पेपर स्प्रे नेहमी ठेवावा. जर एखाद्याच्या डोळ्यांवर पेपर स्प्रे मारला तर त्याला काही काळ दिसणं बंद होतं आणि तुम्ही संकटातून बाहेर पडू शकता. सुरक्षिततेसाठी पेपर स्प्रे खुप महत्त्वाचा आहे.
2/6

पेपर स्प्रेसारखाच पेपर जेल देखील असतो. दूर अंतरावरुन देखील पेपर जेल स्प्रे केला तरी त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो.
3/6

सुरक्षिततेसाठी लेझर टॉर्चचाही वापर करता येतो. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर लेझर टॉर्च वापरल्यास त्याला काही काळ दिसणं बंद होतं.
4/6

महिला त्यांच्यासोबत फोल्डेबल रॉड देखील ठेवू शकतात. हा रॉड खूप हलका आणि पोर्टेबल असतो, जो सहजपणे तुम्हाला बॅगमध्ये ठेवता येतो, याच्या मदतीने तुम्ही शत्रूवर हल्ला करू शकता.
5/6

तुम्ही स्टन गनने देखील स्वतःचं संरक्षण करू शकता. ही एक प्रकारची इलेक्ट्रॉनिक गन आहे, जी दाबली की समोरच्या बाजूने दोन तारा बाहेर येतात. या तारा हल्लेखोराला लागल्या तर त्यातून वाचणं खूप कठीण होतं. अशा स्थितीत, तुम्ही स्वत:ला वाचवू शकता आणि तेथून पळ काढू शकता.
6/6

महिला स्वत:सोबत सेफ्टी अलार्म देखील ठेवू शकतात. यातून इतका मोठा आवाज येतो की समोरचा माणूस फक्त आवाजानेच घाबरुन जातो. सेफ्टी अलार्मच्या आवाजाने गर्दी जमवण्यास देखील मदत होते.
Published at : 30 Jul 2023 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
