एक्स्प्लोर
Skin Care : चेहऱ्यावर बेसन लावताय? जास्त वापरल्यास होऊ शकतं दुष्परिणाम!
रोज बेसनाचा फेसपॅक लावल्यानं त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन बिघडू शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी, लालसर आणि खाज सुटू शकते.
Skin Care : रोज बेसनाचा फेसपॅक लावल्यानं त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन बिघडू शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी, लालसर आणि खाज सुटू शकते. (Photo Credit : Pinterest)
1/9

अनेक लोकं चेहऱ्यावर नैसर्गिक तेज मिळवण्यासाठी आणि टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी बेसन पिठाचा वापर करतात.
2/9

बेसन पिठात विविध घटक मिसळून फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? जास्त प्रमाणात बेसन पिठाचा वापर केल्यास त्वचेवर उलट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात...
3/9

जर तुम्हाला त्वचेची कोणतीही ऍलर्जी असेल, तर बेसन पिठाचा वापर टाळा. यामुळे तुमच्या त्वचेवर कोरडेपणा,खाज सुटणे किंवा त्वचा सेन्सिटिव्ह होणे
4/9

सेंसिटिव्ह त्वचेवर बेसन पिठ लावल्यास पिंपल्सची संख्या वाढू शकते. तसेच त्वचेला जळजळ होणे आणि लालसर डाग किंवा चट्टे उठण्याची शक्यता देखील वाढते, त्यामुळे सेंसेटिव्ह त्वचेसाठी बेसनचा वापर काळजीपूर्वक करावा.
5/9

ड्राय स्किन असलेल्या लोकांनी बेसन पिठाचा वापर टाळावा किंवा फारच कमी प्रमाणात करावा. कारण बेसन त्वचेवरील ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि सोलवटू शकते.
6/9

रोज बेसनाचा फेसपॅक लावल्यानं त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन बिघडू शकतो.
7/9

त्यामुळे त्वचा कोरडी, लालसर आणि खाज येणारी होऊ शकते. म्हणून आठवड्यात फक्त 1–2 वेळा बेसन वापरणे चांगलं.
8/9

बेसनामध्ये थोडे केमिकल घटक असल्यामुळे बेसन चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावल्यास जळजळ होऊ शकते. त्यामुळे संवेदनशील त्वचेवर काळजीपूर्वक किंवा कमी प्रमाणात वापरणे योग्य ठरेल .
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 07 Oct 2025 04:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























