एक्स्प्लोर
Lifestyle: परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकवायचाय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Perfume Hacks: दिवसभर येणारा घामाचा दुर्गंध दूर करण्यासाठी आपण परफ्युमचा वापर करतो. पण बऱ्याचदा परफ्युमचा सुगंध केवळ काही क्षण राहतो आणि नंतर निघून जातो. तर, हा सुगंध टिकवण्यासाठी काही टिप्स पाहूया.

How to use Perfume
1/8

घामाचा वास दूर करण्यासाठी जेव्हा तुम्ही डिओड्रंट वापरता, त्यावेळी तुमच्या शरीराचा भाग स्वच्छ असेल याची काळजी घ्या. नेहमी परफ्युम आणि डिओड्रंटचा वापर स्वच्छ त्वचेवर करा.
2/8

मनगटावर परफ्युम स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या मनगटाने लगेच घासू नका, त्यामुळे परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकत नाही.
3/8

कानाच्या मागे, मनगटावर परफ्युम स्प्रे करा. या ठिकाणी परफ्युमचा सुगंध जास्त काळ टिकतो.
4/8

कोरड्या त्वचेवर परफ्युम मारल्यास जास्त काळ सुगंध टिकत नाही. त्यामुळे मॉइश्चराइझर लावल्यानंतरच डिओ किंवा परफ्युम स्प्रे करा.
5/8

अंघोळीच्या नंतर लगेच परफ्युम आणि डिओड्रंटचा वापर करणं चांगलं असतं. घामाने भरलेल्या अंडरआर्म्सवर चुकूनही परफ्युम किंवा डिओ स्प्रे करू नये, तरच तुमच्या परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकेल.
6/8

परफ्युम मारताना शरीरापासून 15 सेंटीमीटर अंतरावरुनच तो स्प्रे करावा, यामुळे परफ्युम किंवा डिओ संपूर्ण अंगावर पसरतो आणि सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो.
7/8

तुम्ही रोल ऑन डिओड्रंट वापरत असाल तर त्याआधी शरीरावर टॅल्कम पावडर लावा, असं केल्यास डिओचा सुगंध दीर्घकाळ टिकेल.
8/8

अंडरआर्म्सवर केस असतील तर डिओचा सुगंध जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे नेहमी शेव किंवा वॅक्स करा. पण शेविंग किंवा वॅक्सिंग केल्याच्या नंतर लगेच त्यावर डिओ मारु नका, अन्यथा शरीरावरील त्या भागाची जळजळ होईल. शेविंग/वॅक्सिंगच्या 2 दिवसांनंतर तुम्ही परफ्युमचा वापर करू शकता.
Published at : 26 Jun 2023 03:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
