एक्स्प्लोर
Dating Tips : पहिल्यांदा डेटवर जात आहात? इम्प्रेस करण्याकरता 'या' गोष्टी ठेवा लक्षात , डेट होईल खास
डेट हा जोडप्यासाठी खूप खास क्षण असतो आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असता तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात.
Dating Tips
1/10

डेटिंगसाठी असे कोणतेही नियम नाहीत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या या छोट्या गोष्टी समोरच्याला इम्प्रेस करतील. या गोष्टी जाणून घेऊया.
2/10

तुम्ही तुमच्या डेट करणाऱ्या व्यक्तीसोबत चांगले वर्तन ठेवावे हे सर्वात महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर डेट दरम्यान तुमच्या वागण्याने तुमच्या आजूबाजूच्या लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा.
3/10

बोलत असताना, त्यांच्याकडे पहा, स्मित करा आणि नजर त्यांच्याकडेच असू द्यात.
4/10

डेटवर लगेच तुमच्या उणिवा सांगू नका. खरं तर महिलांना आत्मविश्वासू पार्टनर आवडतात. त्याकरता आधी स्वत:वर प्रेम करा.
5/10

डेटवर गेल्यावर मुलांनी सुरूवातील बिल भरणे मुलींना आवडते. तर शक्यतो प्रयत्न करा की, तुम्हीच बिल भराल.
6/10

लोक सहसा पहिल्या डेटला खूप घाबरतात. अशा परिस्थितीत त्यांना या खास क्षणाचा आनंद घेता येत नाही. तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत आहात याची जाणीव तुमच्या जोडीदाराला करून द्या.
7/10

प्रत्येकाच्या सवयी सारख्या नसतात, अनेकांच्या सवयी वेगळ्या असतात. डेट दरम्यान एकमेकांच्या उणीवा दाखविणे टाळा. एकमेकांमधील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
8/10

पहिल्या डेटकरता जागा खूप महत्वाची असते. त्यामुळे तुमच्या दोघांना आवडेल अशी जागा निवडा. तुम्ही दोघे मिळून जागा निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला तिथे आरामदायी वाटेल. खूप गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
9/10

डेटवर समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या. तिला/त्याला काय आवडते. छंद काय आहेत? हे समजून घ्या.
10/10

इम्प्रेस करण्याकरता वाढीव काही करू नका. पहिली डेट साधी आणि मजेदार असू द्यात.
Published at : 02 Oct 2023 04:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
नवी मुंबई
























