एक्स्प्लोर
Healthy Pregnancy Tips : गरोदरपणातील 'असा' आहार, प्रत्येक महिलेनं जाणून घ्याव्यात..
Healthy Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, आवश्यक पोषकद्रव्ये आणि ताणमुक्त जीवनशैली खूप महत्त्वाची असते.
Healthy Pregnancy Tips
1/9

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असल्यामुळे तिला दररोज पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे असते.
2/9

आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी प्रोटीन, कर्बोदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार आवश्यक असतो.
3/9

लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे गर्भाच्या वाढीसाठी, हाडांच्या विकासासाठी आणि मेंदूच्या योग्य कार्यासाठी विशेषत आवश्यक असतात.
4/9

मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि वेळेवर अन्न सेवन करणे फायदेशीर ठरते.
5/9

गर्भवती महिलेला सामान्यापेक्षा 300 ते 350 अतिरिक्त कॅलरीजची गरज असते, त्यामुळे तिच्या आहारात फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट नक्की असावेत.
6/9

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह आणि फॉलिक ऍसिडची गोळी घेणे अशक्तपणा टाळण्यासाठी आणि बाळाच्या योग्य विकासासाठी मदत करते.
7/9

संपूर्ण धान्य, पुरेसे फायबर आणि व्हिटॅमिन डीयुक्त अन्नामुळे पचन सुधारते आणि आईचे संपूर्ण आरोग्यही चांगले राहते.
8/9

गर्भधारणेदरम्यान ताण कमी ठेवणे, वेळेवर औषधे घेणे आणि डॉक्टर सांगतील तेवढाच व्यायाम करणे सुरक्षित गर्भधारणेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरते.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 20 Nov 2025 01:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























