एक्स्प्लोर
'हे' आहेत दिवाळीतील सर्वात धोकादायक फटाके; कॅन्सरचा गंभीर इशारा!
दिवाळीतील नाग गोळी फटाके विषारी रसायनांमुळे धूर सोडतात, ज्यामुळे कॅन्सर, फुफ्फुसांचे नुकसान, दमा, ऍलर्जी आणि लहान मुलांसाठी अधिक धोका निर्माण होतो.
Health Tips
1/9

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. लोक दिवे लावून, मिठाई खाऊन आणि काहीजण फटाके फोडून तो साजरा करतात.
2/9

पण फटाके आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. त्यातले नाग गोळी हा फटका सर्वात धोकादायक आहेत, कारण ते कॅन्सरचा धोका वाढवतात.
3/9

आता प्रश्न असा आहे कि , नाग गोळी किती धोकादायक आहे? तो छोटा फटाका असतो. पेटवल्यावर सापासारखा पसरतो आणि धूर सोडतो. तो आवाज करत नाही, पण त्याचा धूरच सर्व आजारांचे कारण ठरतो.
4/9

नाग गोळी नायट्रेट, सल्फर, जड धातू आणि कार्बनयुक्त रसायनांपासून बनवले जातात. पेटवल्यावर ते नायट्रिक ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि जड धातू असलेला विषारी धूर सोडतात.
5/9

यामुळे अनेक समस्या होतात. विषारी रसायने शरीरात साचून कॅन्सरचा धोका वाढवतात. धूर फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो आणि दमा, ब्राँकायटिस, ऍलर्जी वाढवतो. तसेच डोळ्यांना जळजळ, पाणी येणे आणि त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते.
6/9

नाग गोळी हा फटका लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
7/9

फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरसारखी रसायने असतात. ती श्वसनाचे विकार आणि फुफ्फुसांचे नुकसान करू शकतात.
8/9

कोळसा मायग्रेन आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. स्ट्रॉन्टियम नायट्रेटही कर्करोग वाढवतो. फटाक्यांमध्ये बेरियम, तांबे आणि परक्लोरेटसारखी रसायनेही असतात.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 21 Oct 2025 03:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























