एक्स्प्लोर
Health Tips : तुम्हीही हेडफोनचा अधिक वापर करताय का? मग त्याचे तोटे आधी जाणून घ्या
Health Tips : तुम्हीही हेडफोनचा अधिक वापर करताय का? मग त्याचे तोटे आधी जाणून घ्या
Health Tips (Photo Credit : Pixabay)
1/10

आजकाल लाहनांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हेडफोन वापरतांना आपण पहातोय. तुम्ही हल्ली पाहत असाल की, जो तो व्यक्ती कानात हेडफोन घातलेला दिसेल. कदाचित तुम्हीही या व्यक्तींपैकी एक असाल. (Photo Credit : Pixabay)
2/10

तुम्ही जर हेडफोनचा अधिक वापर करत असाल तर त्याचे होणारे तोटे जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
3/10

हेडफोनचा वापर करुन मोठ्या आवाजात संगीत किंवा ध्वनी जास्त काळ ऐकल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
4/10

मोठा आवाज करून तुम्ही खूप जास्त काळ गाणे ऐकत राहिल्याने तुमची ऐकण्याची क्षमताच कमी होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
5/10

तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी अधूनमधून हेडफोनमधून ब्रेक घेणं, आवाज कमी करुन ऐकणं आणि हेडफोन वापरण्याचा कालावधीही निश्चित करणं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.(Photo Credit : Pixabay)
6/10

दीर्घकाळ हेडफोन घातल्याने कानाच्या आतील बाजूस उबदार आणि ओलसर वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कानात संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत बॅक्टेरिया गरजेपेक्षा अधिक वाढू शकतात. (Photo Credit : Pixabay)
7/10

कानाची चांगली स्वच्छता राखणे तसेच तुमचे हेडफोन नियमितपणे स्वच्छ करणे आणि त्याचा वापर करण्यापासून मध्ये मध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे. असं केल्यानेच हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
8/10

वारंवार हेडफोन वापरल्याने पोस्चर खराब होऊ शकते. हेडफोनचा अधिक वापर केल्याने आपलं आपल्याकडेच कमी लक्ष राहतं. त्यामुळे मान, खांदे आणि मणक्याला ताण येऊ शकतो.(Photo Credit : Pixabay)
9/10

सतत हेडफोन वापरल्याने अवलंबित्व किंवा व्यसन निर्माण होऊ शकते. या व्यसनामुळे व्यसनग्रस्त व्यक्तीला हेडफोन न घालता राहणं किंवा संगीत न ऐकल्याशिवाय काहीही करणं कठीण वाटू शकते. (Photo Credit : Pixabay)
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 25 Jan 2024 05:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र


















