एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

दार न उघडल्याने बाहेर जमलेल्या गॅंगने दगडफेक करायला सुरुवात केली. आरोपी शुभम जाटने भीतीपोटी गच्चीवर जाणाऱ्याच्या दिशेने गोळी झाडली.  

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाइल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर उफाळून आला. सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. आरोपींनी घरावर दगडफेक केली, तसेच मध्ये पडणाऱ्या नागरिकांनाही जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शुभम जाटसह सात आरोपींना अटक केली आहे. ( Crime News)

जमाव बघताच फरार

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास घराच्या दारावर मोठा दगड आढळल्याचा आवाज आला. अनेक लोक बाहेर शिवीगाळ करत होते. बाहेर घेण्यासाठी चिथावत होते . आरोपी शुभम जाट सह इतरांच्या हातात गावठी कट्टा आणि तलवारी चाकू अशी हत्यार होती. दार न उघडल्याने बाहेर जमलेल्या गॅंगने दगडफेक करायला सुरुवात केली. आरोपी शुभम जाटने भीतीपोटी गच्चीवर जाणाऱ्याच्या दिशेने गोळी झाडली.  

गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. थोडक्याने मध्ये पडणाऱ्या सगळ्यांना ठार मारण्याचा धमक्या दिल्या. जमाव वाढतोय हे लक्षात येताच आरोपींनी पलायन केलं. मोबाईल चोरीच्या एका वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. 

पाण्याच्या टाकीत बसला लपून

घटनेनंतर पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, अजय कांबळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, नरसिंग पवार आदिनी बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपामागे शुभमचे घर गाठले. तेथे हल्लेखोर असल्याने पथकाने घराला घेराव घातला, काही हल्लेखोरांनी गच्चीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर उर्फ अतुल पवार यांना पकडले. मात्र, शुभम सापडला नाही. तो रेल्वेरुळाच्या दिशेने पळून गेल्याचे त्याच्या आईने सांगितले. मात्र, ती खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने निरीक्षक भंडारे, अर्जुन राऊत यांनी गच्चीवरील पाण्याच्या टाक्या तपासण्यास सुरुवात केली. त्यात एका टाकीत शुभम सापडला.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
Embed widget