एक्स्प्लोर
Fruit Juice For Weight Loss: आहारात या फळांच्या रसाचा समावेश करा, फिगर होईल मौनी रॉयसारखी!
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करू शकता ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. फळांच्या रसाचा आहारात समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता.
Weight Loss
1/10

वजन कमी करणे सोपे नाही. काहीजण रात्रंदिवस जिममध्ये घाम गाळतात, तर काही काटेकोर डाएट रूटीन फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण जर तुम्हाला या सगळ्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही काही सोप्या मार्गांनी वजन कमी करू शकता आणि सुंदर फिगर मिळवू शकता.
2/10

तुमच्या रोजच्या आहारात फळांच्या रसाचा समावेश करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
3/10

दररोज रिकाम्या पोटी काही फळांचा रस प्यायल्याने चरबी सहज जाळली जाऊ शकते.
4/10

टरबूजाचा रस पिण्यास अतिशय चवदार असतो. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. टरबूजमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
5/10

वजन कमी करण्यासाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर आहे. संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या रसाचा आहारात समावेश करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
6/10

संत्र्याचा रस कमी कॅलरीचा असतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो.
7/10

सफरचंदाचा रस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सफरचंदात भरपूर फायबर असते. सफरचंदाचा रस प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते.
8/10

हा रस चयापचय वाढवतो आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करतो. वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस लिंबाचा रस मिसळून पिणे फायदेशीर ठरू शकते.
9/10

पपईचा रस चरबी काढून टाकण्यास मदत करतो. पपईच्या रसामध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. हा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा रस प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)
Published at : 04 Jan 2023 12:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
























