मधुमेह म्हटलं की, रुग्णाच्या खाण्यापिण्याची पथ्ये आणि पदार्थ या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा मधुमेहग्रस्त व्यक्तींना कोणतेही फळ खाताना देखील प्रचंड टेन्शन येते. फळातील गोडवा, त्यातील साखर यामुळे मधुमेह वाढणार तर नाही ना, याची त्यांना काळजी वाटत असते. कोणती फळे खावीत, खाऊ नयेत किंवा कोणती फळे मर्यादित प्रमाणात खावी हेच त्यांना कळत नाही. जास्त गोड फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
2/7
मात्र, अशीही काही फळे आहेत, जी चवीला गोड असली तरी त्यातील गोडवा मधुमेहासाठी हानिकारक ठरत नाही. अशी फळे मधुमेहग्रस्त लोक सहज खाऊ शकतात. चला तर, जाणून घेऊया अशा फळांबद्दल...
3/7
सफरचंद हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. सफरचंदात भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
4/7
किवीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनीयुक्त किवी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
5/7
संत्र हे फळ सुपरफूड मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही संत्री खूप लाभदायी असतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
6/7
पीच या फळामध्ये देखील भरपूर फायबर असते. ते खाल्ल्याने रक्तातील साखरही नियंत्रित राहते. उन्हाळ्यात पीच आवर्जून खावे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील ते फायदेशीर ठरते.
7/7
पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच GI असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.