एक्स्प्लोर
Homemade Herbal Tea : घरच्या घरी बनवा लवंग-लिंबू हर्बल टी; शरीर निरोगी आणि ऊर्जा भरपूर!
घरच्या घरी तयार होणारा लवंग-लिंबू चहा; पचन सुधारतो, त्वचा चमकदार ठेवतो आणि सर्दी, खोकला व इतर आजारांपासून शरीराला मजबूत ठेवतो.
Homemade Herbal Tea (Photo Credit : Pinterest)
1/8

लिंबू आणि लवंग दोन्ही त्वचेला आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला मुरुमुक्त आणि नैसर्गिकरित्या चमकदार ठेवण्यास मदत करते.
2/8

लवंगात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म दात आणि हिरड्या मजबूत करतात तसेच हिरड्यांच्या सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचवेळी, लिंबू दातांचा पिवळेपणा आणि दुर्गंधी दूर करण्यास उपयुक्त आहे.
3/8

तुम्हाला लवंग आणि लिंबू असलेल्या हर्बल टीबद्दल माहित आहे का? जी घरच्या घरी सहज बनवता येते आणि तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
4/8

लिंबू व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे आणि लवंगमध्ये जीवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणून, लिंबू आणि लवंग एकत्र केल्यास एक आरोग्यदायी हर्बल चहा तयार होतो, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
5/8

लिंबू आणि लवंग दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात. लवंगात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, तर लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी पचनसंस्थेला निरोगी ठेवते.
6/8

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे चयापचय सुधारते, तर लवंग वजन कमी करण्यात मदत करते. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यास शरीर डिटॉक्सिफाय होते.
7/8

यासाठी 1 ग्लास पाण्यात 2 लवंग आणि 1 लिंबाचा रस मिसळून उकळवा. हे तुम्ही थेट पिऊ शकता, किंवा थोडे मध घालून देखील पियू शकता . लक्षात ठेवा, हे रिकाम्या पोटी पिऊ नका; जर प्यायचे असेल तर आधी दोन ग्लास पाणी प्या.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Oct 2025 04:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















