एक्स्प्लोर
Guava Benefits : पेरू तर सगळेच खातात, पण पेरूचे आश्चर्यकारक फायदे माहित आहे का?
Guava Benefits : मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते.

guava
1/9

पेरू फक्त खायलाच रुचकर नाही, तर त्यात अनेक पोषकतत्त्वे असतात, ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यापासून तुम्हाला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
2/9

मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते जे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात आणि तुमच्या मज्जातंतूंना आराम देतात.
3/9

पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. हे आपल्या थायरॉईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास मदत करते.
4/9

पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. अँटिऑक्सिडंट्समुळे ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित राहतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
5/9

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही गुणधर्म आवश्यक आहेत.
6/9

पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात. जेणेकरून आपण तरुण दिसू लागतो. पेरू खाल्ल्याने वृद्धत्व चेहऱ्यावर लवकर दिसत नाही.
7/9

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यात फायबर असते ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.
8/9

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जरी हे जीवनसत्व जास्त नसले तरी ते तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सी यामध्ये आढळते, ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 15 Jul 2023 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
विश्व
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
