एक्स्प्लोर
Winter Tips: भेगा पडलेल्या टाचांमधून रक्त येण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय, त्वचा गुलाबासारखी मऊ होईल...
जाणून घ्या ते घरगुती उपाय, ज्यामुळे टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.
craked heels
1/7

हिवाळ्यात त्वचेतील कोरडेपणा ही सर्वात मोठी समस्या असते. पायाच्या टाच फुटू लागतात. त्यांच्यात वेदना होतात एवढेच नाही तर रक्तही बाहेर येऊ लागते.
2/7

हे टाळण्यासाठी लोक महागड्या क्रिम्सचा वापर करतात, तरीही आराम मिळत नाही, अशा वेळी जाणून घ्या ते घरगुती उपाय, ज्यामुळे टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.
3/7

हिवाळ्यात भेगा पडलेल्या टाचा घासल्या पाहिजेत. साखर, मध आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही घरीच स्क्रब तयार करु शकता यामुळे तुमच्या टाचांच्या मृत पेशी निघून जातात.
4/7

भेगा पडलेल्या त्वचेवर झोपण्यापूर्वी व्हॅसलीन लावा. त्वचा हळूहळू मऊ होईल.
5/7

टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी मेण उपयुक्त आहे. त्यात दोन थेंब तेल मिसळून पायाला लावा व त्यासोबत मोजे घाला. त्यानंतर सकाळी पाय स्वच्छ करा टाच हळूहळू बरे होऊ लागतील.
6/7

टाचांच्या भेगांपासून सुटका हवी असेल तर गरम पाण्यात पाय टाकून बसा. यानंतर, टाचेला प्युमिस स्टोनने घासून स्वच्छ करा. यानंतर बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल गरम करून टाचांवर लावा. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 19 Dec 2022 04:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















