एक्स्प्लोर
Diwali 2022 : दिवाळी अवघ्या 15 दिवसांवर; विविध फुलांची आरास, फराळ आणि आकाश कंदीलांनी बाजार सजले, खरेदीसाठी लगबग सुरु
Diwali 2022 : ऑक्टोबर (October 2022) महिना हा विविध सणांनी भरलेला महिना आहे. नुकताच नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण पार पडला. आता लोकांना वेध लागले आहेत ते दिवाळी सणाचे.
![Diwali 2022 : ऑक्टोबर (October 2022) महिना हा विविध सणांनी भरलेला महिना आहे. नुकताच नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण पार पडला. आता लोकांना वेध लागले आहेत ते दिवाळी सणाचे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/613649a42b23dc6ebdee17d99b4f4fe81665219381721358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Diwali 2022
1/9
![खरंतर, दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे कोणतेच सण मनापासून साजरे करता येत नव्हते. मात्र, यावर्षी सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने उत्सवाची, सणांची, आनंदाची रंगत अधिकच वाढत चालली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/88b5bd624b1a860baa471ba20051814842de1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खरंतर, दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे कोणतेच सण मनापासून साजरे करता येत नव्हते. मात्र, यावर्षी सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने उत्सवाची, सणांची, आनंदाची रंगत अधिकच वाढत चालली आहे.
2/9
![दिवाळीचा सण अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच तुम्हालाही घरची साफसफाई, विविध वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचं प्लॅनिंग आणि विविध सणांची तयारी अशा बऱ्याच गोष्टी करायच्या असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/c825b257bf386ea5917447ef33b1621ad9bc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीचा सण अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच तुम्हालाही घरची साफसफाई, विविध वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचं प्लॅनिंग आणि विविध सणांची तयारी अशा बऱ्याच गोष्टी करायच्या असतील.
3/9
![दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/b55964692fb13fad18917234e947047d4c045.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते.
4/9
![आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या दरम्यान हा सण येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/139210a1df7f545f3e4cffeacbdcde743e97f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या दरम्यान हा सण येतो.
5/9
![दिवाळी हा सण दरवर्षी पाच दिवसांचा असतो. मात्र यावर्षी दिवाळी चार दिवस साजरी करता येणार आहे. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे मुख्य दिवस साजरे केले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/cf2ec7691507cd214ba7fb27072cfd4a793e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी हा सण दरवर्षी पाच दिवसांचा असतो. मात्र यावर्षी दिवाळी चार दिवस साजरी करता येणार आहे. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे मुख्य दिवस साजरे केले जातात.
6/9
![दिवाळीत आजूबाजूचा परिसर कसा दिव्यांनी, रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी उजळून निघतो. त्यामुळे वातावरणात एक नवं चैतन्य, नवी ऊर्जा निर्माण होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/bf98966871fd7f21186d96432daff0e972049.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीत आजूबाजूचा परिसर कसा दिव्यांनी, रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी उजळून निघतो. त्यामुळे वातावरणात एक नवं चैतन्य, नवी ऊर्जा निर्माण होते.
7/9
![दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/6dbf9eb631b81f90be6c9abf57f46da5e9374.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे.
8/9
![दिवाळीत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणखी एक आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे विविध फराळांचा. दिवाळीत लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेवया, शंकरपाळे अशा विविध फराळांची जणू काही आरासच मांडलेली असते. आणि त्यावर सगळेच ताव मारतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/e518d75e5c50b6d3b8c44b74e59b285664127.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणखी एक आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे विविध फराळांचा. दिवाळीत लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेवया, शंकरपाळे अशा विविध फराळांची जणू काही आरासच मांडलेली असते. आणि त्यावर सगळेच ताव मारतात.
9/9
![वर्षातून एकदा उत्साहाचा, चैतन्याचा आनंद म्हणजे दिवाळी. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/f50222a0caea40a51ce1d250cbf903995f571.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्षातून एकदा उत्साहाचा, चैतन्याचा आनंद म्हणजे दिवाळी. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहतो.
Published at : 08 Oct 2022 02:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)