एक्स्प्लोर
Health Tips : कफ, सर्दी, खोकल्यावर मात करायचीय? दालतचिनीची 'असा' वापर करा
Cinnamon Benefits : हिवाळ्यात कफच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दालचिनीचा वापर नक्की करा.
Cinnamon Benefits
1/8

दालचिनी हे झाडाच्या सालीपासून तयार करतात. मसाल्यातील तमालपत्र तुम्हाला माहित असेल. या तमालपत्राच्या झाडाच्या सालीला सुकवल्यावर त्यालाच दालचिनी असं म्हणतात.
2/8

दालचिनी वात आणि कफ दोष दूर करण्यात फायदेशीर आहे. मात्र, याच्या अधिक सेवनाने पित्ताची समस्या उद्धवू शकते. त्यामुळे याचं सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे.
3/8

दालचिनी वात आणि कफ नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच या दोन्ही दोषांमुळे होणारे आजार दालचिनीच्या सेवनाने आटोक्यात ठेवता येतात.
4/8

दालचिनी हा अतिशय गरम मसाला आहे. याचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ, त्वचेवर खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून, दररोज मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
5/8

एक व्यक्ती एका दिवसात दालचिनीचा एक इंच मोठा तुकडा खाऊ शकतो. तुम्ही दालचिनी पावडर वापरत असाल तर दिवसभर सामान्य आकाराच्या चमचे वापरा.
6/8

थंडीच्या मोसमात घसा खवखवणे, कफ, सर्दी किंवा तापाची समस्या उद्भवते. थंड वाऱ्यांमुळे शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
7/8

अशावेळी तुम्ही दालचिनीची वापरू शकता. यासाठी तुम्ही एक चतुर्थांश चमचा (1/4) दालचिनी पावडर एक चमचा मधात मिसळा. हे मिश्रण बोटाच्या साहाय्याने हळूहळू चाटून खा. सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. तुम्हाला लवकरच याचा फायदा जाणवेल.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 12 Feb 2023 10:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
