माऊंट एटना येथील ज्वालामुखी पाहण्यासाठी जगभरातून लोक याठिकाणी येतात. रात्रीच्या अंधारात हा ज्वालामुखी चमकतो ती दृष्य नयनरम्य असतात.
2/6
माऊंट एटना ज्वालामुखी जवळपास 7 लाख वर्षांपासून सक्रीय आहे. दरवर्षी हा ज्वालामुखी जवळपास 10 लाख टन लावा आणि 7 मिलियन टन कार्बन डायॉक्साईड, पाणी आणि सल्फर डायऑक्साईडची निर्मिती करतो.
3/6
लावा चार किलोमीटरपर्यंत खाली पसरला आहे. मात्र या ज्वालमुखीच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या शहरांना काहीही धोका नसल्याचं बोललं जात आहे.
4/6
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर निघालेला लावा दूरवर पसरला आहे. युरोपातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीतून निघणारा लावा पाहण्यासाठी लोकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.
5/6
त्याआधी बऱ्याच दिवसांपासून ज्वालामुखीच्या अंतर्भागात हालचाली सुरु होत्या. एका आठवड्यात येथे ज्वालामुखीचे चार स्फोट झाले.
6/6
माऊंट एटना आपल्या ज्वालामुखीच्या स्फोटासाठी प्रसिद्ध आहे. या पर्वतावर अतिसक्रीय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखीचा गेल्या आठवड्यात स्फोट झाला.