एक्स्प्लोर
Miss Universe 2022: कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2022 मध्ये करतेय भारताचे प्रतिनिधित्व!
संपूर्ण जगाच्या नजरा 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2022 स्पर्धेकडे लागल्या आहेत. या स्पर्धेत भारताकडून दिविता रायचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी.
(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
1/9

मिस युनिव्हर्स स्पर्धेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. भारताच्या सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू यांनी हा मुकुट आपल्या डोक्यावर सजवला आहे. (फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
2/9

या तिन्ही महिलांनी मिस युनिव्हर्सचा मुकुट परिधान करून देशाचे नाव उंचावले आहे. (फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
3/9

आता ही स्पर्धा पुन्हा एकदा 14 जानेवारीला होणार आहे. यामध्ये जगभरातून 84 महिला सहभागी होणार आहेत. भारतातील दिविता राय यात सहभागी होणार आहेत. भारताला तिच्याकडून खूप आशा आहेत.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
4/9

दिविता रायचा जन्म 10 जानेवारी 1998 रोजी मंगळूर येथे झाला. तिने कर्नाटकातील राजाजीनगर येथील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ती मुंबईला गेली.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
5/9

दिविताने मुंबईच्या सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केले आहे.ती व्यवसायाने एक मॉडेल तसेच आर्किटेक्ट आहे.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
6/9

25 वर्षीय दिविता रायला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते. तिला चित्रकला आणि संगीताचीही आवड आहे.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम).
7/9

दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात. वडिलांमुळे ती देशातील अनेक शहरांमध्ये राहिली आहे.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
8/9

दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे. अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड सुष्मिता सेन ही तिची प्रेरणा आहे.(फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
9/9

2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती. (फोटो सौजन्य : divitarai/इंस्टाग्राम)
Published at : 13 Jan 2023 03:50 PM (IST)
आणखी पाहा























