एक्स्प्लोर
Wayanad Landslides : वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना; दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी पुढे केला मदतीचा हात, कोणत्या कलाकारांनी किती दिली रक्कम
Wayanad Landslides : केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत 309 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळवर ओढावलेल्या या प्रसंगानंतर दाक्षिणात्य कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
Wayanad Landslide South Celebs Donate Heavy Amount: 30 जुलै रोजी केरळमधील वायनाड मधील सकाळ ही एक काळरात्र ठरली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. या घटनेत 300 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण मृत्यूशी दोन हात करत आहेत. तर, या घटनेत काहीजण बेपत्ता देखील झाले आहेत. भारतीय हवाई दलापासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि पोलिसांची अनेक पथके मदत आणि बचावकार्यात गुंतली आहेत. या दरम्यान दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
1/7

29 जुलैच्या रात्री उशिरा वायनाडच्या अट्टामाला, मुंडक्काई, चुरलमाला आणि नूलपुझा गावात भूस्खलनाची घटना झाली. यामध्ये वाहने, घरे आणि पूल वाहून गेले आहेत. वायनाडमधील घटनेची दृष्ये मनं हेलवणारी आहेत.
2/7

भूस्खलनाच्या घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. भारतीय लष्करांच्या जवानांनी 1000 हून अधिक लोकांना वाचवले असून 3000 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. शेकडो लोकांचा मृत्यूही झाला आहे.
Published at : 02 Aug 2024 11:43 AM (IST)
आणखी पाहा























