भारतीय सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांची रंगत काही औरच असते. कलाविश्वापासून क्रीडा आणि राजकीय वर्तुळातील अनेक चेहरे अशा सोहळ्यांच्या वेळी एकाच ठिकाणी आलेले दिसतात. अशाच काही सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. ज्यामुळं हे विवाहसोहळे जरा जास्तच लक्ष वेधून गेले होते.
2/7
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनासच्या विवाहसोहळ्यातही पंतप्रधान दिसले होते.
3/7
विरोधी पक्ष, काँग्रेस नेते मनू सिंघवी यांचा मुलगा अविष्कार सिंघवी याच्या विवाहसोहळ्यातही पंतप्रधानांनी सर्वाचं लक्ष वेधलं.
4/7
2018 मध्ये क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी पाहायला मिळाली.
5/7
बॉलिवूडकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यासाठी पंतप्रधान आवर्जून उपस्थित राहिले होते.
6/7
हेमा मालिनी यांची मुलगी अहाना हिच्या विवाहसोहळ्यातील समारंभातही पंतप्रधानांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
7/7
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या दिल्लीती रिसेप्शनसाठी पंतप्रधान उपस्थित राहिले होते.