एक्स्प्लोर
Munmun Datta : 'तारक मेहता' मधील बबिताजी इतर कोणत्याही शोमध्ये का दिसत नाही? कारण ऐकून थक्क व्हाल!

munmun datta
1/6

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जवळपास 13 वर्षांपासून या शोला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळत आहे. या शोमध्ये बबिताची भूमिका साकारून मुनमुन दत्ता घरोघरी लोकप्रिय झाली आहे.(photo:therealmunmundutta/ig)
2/6

बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताची गणना तारक मेहता का उल्टा चष्माच्या जुन्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. जेठालालच नाही तर चाहत्यांनाही बबिताची भुरळ पडली आहे. पण मुनमुन दत्ताने फक्त तारक मेहता का उल्टा चष्मा शो का केला? या मागचे कारण माहित आहे का? मुनमुन तारक मेहता शो सोडून इतर कोणत्या शो किंवा मालिकेमध्ये का दिसत नाही? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमी पडतो (photo:therealmunmundutta/ig)
3/6

मुनमुन दत्ताने 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'हम सब बाराती' या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2005 आणि 2006 मध्ये तिने दोन चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई केली नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने मात्र मुनमुन दत्ताचे नशीब बदलले (photo:therealmunmundutta/ig)
4/6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये मुनमुन दत्ताने अभिनेता अरमान कोहलीला डेट करायला सुरुवात केली होती. हे नाते तिच्यासाठी खूप वेदनादायी होते. अरमानने मुनमुन दत्ताला मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्याची त्याने पोलिसांत तक्रारही केली. त्यामुळे मुनमुन दत्ताच्या करिअरवरही परिणाम झाला.(photo:therealmunmundutta/ig)
5/6

तारक मेहता का उल्टा चष्मा सुरू झाल्यावर समीक्षकांनी मुनमुन दत्ताच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, कालांतराने मुनमुनने शोमध्ये खास स्थान निर्माण केले. मात्र आजही त्यांच्यासमोर कोणताही मोठा पर्याय समोर आलेला नाही.(photo:therealmunmundutta/ig)
6/6

मुनमुन दत्ता ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडिओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही.(photo:therealmunmundutta/ig)
Published at : 23 Nov 2021 01:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
