Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे बाबत विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देताना कंबोज यांनी राज ठाकरेंचा कौतुक करत त्यांच्या संबंधांबाबत भाष्य केलं आहे.

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज आणि मनस अध्यक्ष राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. याबाबत एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये (Coffee With Kaushik) मध्ये मोहित कंबोज यांना राज ठाकरे बाबत विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देताना कंबोज यांनी राज ठाकरेंचा कौतुक करत त्यांच्या संबंधांबाबत भाष्य केलं आहे.
तुम्ही राज ठाकरेंकडे बऱ्याचदा जाता तुमचं राज ठाकरेंशी चांगलं जमतं...
या प्रश्नावर उत्तर देताना मोहित कंबोज म्हणाले, राज ठाकरे हे डायनॅमिक आहेत, जेव्हा कधी तुम्ही त्यांच्यासोबत बसता, ते त्यांचे काही ना काही विचार मांडत असतात, राज ठाकरे मर्द माणूस आहे, राज ठाकरेंची आपलीच एक युएसपी आहे, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत, माझे त्यांच्यासोबत नॉन पॉलिटिकल संबंध आहेत, मी त्यांना खूप मानतो, मी त्यांचा खूप आदर करतो, मला याबाबत माध्यमांमध्ये बोलायलाही काही कारण नाही, राज ठाकरे हे व्हिजनरी नेते आहेत, ते 1997 की 98 मध्ये भारतामध्ये मायकल जॅक्सनला घेऊन आले होते, तेव्हाची 1997 ची ती गोष्ट आहे. त्यांची एक वेगळीच व्हिजनरी आहे, त्यांच्यात एक वेगळाच करिष्मा देखील आहे, जो मला खूप आवडतो. मी जे बोलत आहे, त्यामुळे उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांना वाईट वाटेल, हे पाडकास्ट ऐकल्यानंतर त्यांना थोडा वाईट वाटू शकेल पुढे मिश्किलपणे हसत मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे हे उत्तर भारतीय, बिहारी, यांचे विरोधी नाहीत
तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता तुमच्या एवढे चांगले संबंध आहेत, त्यांच्यासाठी एवढा आदर ठेवतात तर तुम्ही कधी त्यांना विचारलं का की उत्तर भारतीयांचा तुम्ही इतका विरोध का करता? की फक्त त्यांचा राजकीय विरोध आहे हा? या प्रश्नावर बोलताना मोहित कंबोज म्हणाले, राज ठाकरे हे उत्तर भारतीय, बिहारी, यांचे विरोधी नाहीत. त्यांचा जो काही विरोध आहे तो काही विषयांना धरून आहे, असे काही विषय आहेत जे राजकीय असू शकतात, ज्यामध्ये मुंबईची सुरक्षा असेल, किंवा त्यांचे बाकी राजकीय विचार असतील, वैयक्तिक पातळीवरती ते उत्तर भारतीयांची विरोधक आहेत असं मला माझ्या वैयक्तिक पातळीवर वाटत नाही, तो त्यांचा राजकीय स्टॅन्ड असू शकतो, यावर कधी तुमचं दोघांचं बोलणं झालं का? या प्रश्नावर उत्तर देत कंबोज म्हणाले, खरं सांगायचं तर कधी आमच्यात याच्यावर बोलणं कधी झालं नाही, या विषयावर चर्चा झालीच नाही, महानगरपालिका निवडणुकीनंतर तुमचं काही बोलणं झालंय का यावर देखील उत्तर देताना कंबोज म्हणाले, नाही. इतक्यात तरी आमचं काही बोलणं झालं नाही.























