एक्स्प्लोर

Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?

Mumbai Mayor Election 2026: मुंबई महानगरपालिकेची प्रत्येक नस माहिती असणाऱ्या उद्धव ठाकरेंना अगोदरच त्या गोष्टीची कुणकुण लागली, देवाची इच्छा वक्तव्य जाणीवपूर्वक?

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेने बाजी मारली असली तरी आता मुंबईचा महापौर कोण होणार, यावरुन नवे राजकारण रंगले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी काढली जाणार आहे. यामध्ये कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या जातीसाठी आरक्षित (Reservation) होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच मुंबईच्या महापौरपदाच्या (Mumbai Mayor) आरक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे. तसे झाल्यास भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तब्बल 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ही गोष्ट माहिती असल्यामुळेच त्यांनी, 'देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल', हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. जुन्या चक्राकार पद्धतीने यंदा मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या (Schedule tribes) वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.  कारण 2004 पासुन अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास यंदा मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जातीचा महापौर बसेल. अनुसुचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आहेत. त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट ओळखून उद्धव ठाकरे यांनी 'देवा'च्या मनात असेल तर आपला महापौर होईल, हे वक्तव्य केल्याची चर्चा आता रंगली आहे. 

जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब न होता नवीन चक्राकार पद्धतीने जरी सोडत काढली आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरीही भाजप आणि शिवसेनेची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा एकही नगरसेवक नाही. अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेचे राजकारण कोळून प्यायलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे यंदा पालिकेत आपली सत्ता आली नाही तरी महापौरपदी शिवसेनेचा (उबाठा) नगरसेवक बसू शकतो, याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना आला असावा आणि त्यांनी महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केले असावे, असे सांगितले जात आहे. 

आणखी वाचा

मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला, फोडला; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला, फोडला; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
Aaditya Thackeray : ना दिशा सालियनला भेटलो, ना तिच्याशी ओळख, अफवांचा धुरळा उडवणं बंद करा, आदित्य ठाकरेंची 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियन प्रकरणात तब्बल 6 वर्षांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "अफवांचा धुरळा थांबवा, तथ्यांवर बोला!"

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
Embed widget