फिट राहणं ही काळाची गरज बनत चालली आहे. आजकाल सगळेच आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देत आहेत. साधारण लोकसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल करत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. (photo:iamseeratkapoor/ig)
2/7
हेल्दी जेवण, योग्य व्यायाम आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्सच्या दिशेने अनेकजण वाटचाल करत आहेत. फळे खाण्यावर अनेकजण भर देत होते. मात्र, आता त्याचे प्रमाण चांगेलच वाढल्याचे बघायला मिळते. (photo:iamseeratkapoor/ig)
3/7
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सर्वांनाच फिटनेस गोल्स दिले आहेत. वयाच्या 48८व्या वर्षी देखील मलायका अतिशय सुंदर आणि तरुणसुद्धा दिसते. फिटनेसच्या बाबतीत मालयकाच्या तोडीस तोड म्हणून नेहमीच 46 वर्षांच्या शिल्पा शेट्टीच नाव घेतलं जातं. शिल्पा शेट्टी सुरुवातीपासूनच खूप फिट आहे. मधल्या काळात काही अभिनेत्रींचे वेगवेगळ्या कारणांमुळे वजन वाढले होते. (photo:iamseeratkapoor/ig)
4/7
साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक फिट आणि सुंदर अभिनेत्री आहेत. तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथासारख्या अभिनेत्री चांगल्याच फिट आहेत. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या या अभिनेत्रींना देखील, एका नव्या अभिनेत्रीने फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे. अभिनेत्री सिरत कपूरने (Seerat Kapoor) सध्या सगळ्यांनाच चांगलाच फिटनेस गोल दिला आहे. (photo:iamseeratkapoor/ig)
5/7
बॉलिवूडमधील ‘जिद’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र तिने आपला मोर्चा साऊथच्या सिनेमांकडे वळवला. ‘टायगर’, ‘ओक्का क्षणाम’, ‘राजू गरी गढी’सारख्या सिनेमामध्ये तिने काम केले आहे. सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. (photo:iamseeratkapoor/ig)
6/7
तिचे अनेक व्हिडीओ फिटनेसच्या, म्हणजेच व्यायामाच्या बाबतीत असतात. आपले जिममधले अनेक फोटोजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. म्हणून, सध्या साऊथची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री सिरतचे नाव घेतले जाते.(photo:iamseeratkapoor/ig)
7/7
अनेकांना सिरत इतकी फिट कशी काय आहे?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर, तिने स्वतः आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. केवळ वर्कआऊटच नाही, तर सिरत फिट राहण्यासाठी योग्य डाएटदेखील फॉलो करते. योग्य प्रमाणात पाणी पिते आणि फळ खाते. या सर्वांसोबतच ती रोज 8 तासांची झोप घेते. त्यामुळे, अगदी योग्य अशा दिनचर्येमुळे ती इतकी जास्त फिट आणि सुंदर आहे, असं सिरतच मत आहे. (photo:iamseeratkapoor/ig)