एक्स्प्लोर
जोपर्यंत चांदीचं भांडं मिळत नाही, तोपर्यंत पाणीचा घोट घेत नाही 'बिग बॉस 19'ची 'ही' कन्टेस्टंट
Bigg Boss 19 Contestant Tanya Mittal: तान्या मित्तलनं 'बिग बॉस 19' मध्ये प्रवेश केला आहे. तान्या ही ग्वाल्हेरची रहिवाशी आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, उद्योजक तसेच मिस एशिया टुरिझम देखील आहे.
Bigg Boss 19 Contestant Tanya Mittal
1/8

महाकुंभ 2025 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान लोकांचे जीव वाचवून तान्या मित्तल प्रसिद्धीच्या झोतात आली. तिनं सोशल मीडियावर रडत रडत एक व्हिडीओ शेअर केलेला, ज्यामध्ये तिनं त्या भयानक दृश्यांचा उल्लेख केलेला.
2/8

तान्या मित्तल बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच तिचा कथित माजी प्रियकर बलराज सिंहनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर तिच्याबद्दल अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, एक काळ असा होता, जेव्हा तान्या त्याची मोठी चाहती होती. पण, त्यांची मैत्री फार काळ टिकली नाही.
3/8

तान्याबद्दल बोलताना बलराज म्हणाला की, आमची मैत्री तुटली कारण मला खोट्या लोकांशी मैत्री करायला आवडत नाही. तिला फक्त तिचा अहंकार संतुष्ट करायचा आहे.
4/8

बलराज म्हणाला की, तान्या तिला जे हवे आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करते आणि नंतर ती ते सोडून देते.
5/8

बलराज म्हणतो की, तान्या फक्त लोकांचा वापर करते. चांदीचं भांडं मिळेपर्यंत ती पाणी पित नाही. मी तिला शोमध्ये तिचं खरं रूप दाखवण्याचा सल्ला देईन.
6/8

तान्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती एका गरीब मुलाशी लग्न करेल, त्यामुळे तिला स्ट्रगल केल्याशिवाय आयुष्य जगता येईल.
7/8

मीडिया रिपोर्टनुसार, तान्या मित्तलची एकूण संपत्ती 2 कोटी रुपये आहे. तान्यानं एका गरीब मुलाशी लग्न करण्यामागील कारण देखील सांगितलं होतं.
8/8

तिनं म्हटलेलं की, मी कोणावरही वर्चस्व गाजवणार नाही. मला हे करायचं आहे, जेणेकरून मुलगा आयुष्यभर कोणत्याही दबावाखाली राहणार नाही. असा विचार करून मी घर चालवेन. कारण आजकाल मुलं कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांची स्वप्नं चिरडून टाकतात.
Published at : 28 Aug 2025 10:42 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















