एक्स्प्लोर
Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या!
movie
1/6

Republic Day 2022 : भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या.
2/6

रंग दे बसंती (Rang De Basanti) : भगतसिंगांच्या आयुष्यार भाष्य करणारा 'रंग दे बसंती' हा सिनेमा आहे. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील तरुणांप्रमाणेच काम केले तर गोष्टी कशा बदलू शकतात हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाने केला आहे. अमीर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
3/6

शेरशाह (Shershaah) : शेरशाह - परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर शेरशाह हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे धैर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील होते. शेरशाहमध्ये सिद्धार्थ मल्होत्राआणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे.
4/6

1942 अ लव स्टोरी (1942 : A Love Story) : रोमँटिक सिनेमाचे चाहते असणाऱ्यांनी हा सिनेमा बघायलाच हवा. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित भारतीय क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित स्वातंत्र्यपूर्व काळातील एका प्रेमकथेवर सिनेमा भाष्य करतो. सिनेमातील गाणी आरडी बर्मन यांची आहेत.
5/6

राझी (Raazi) : राझी हा मेघना गुलजार दिग्दर्शित सिनेमा आहे. सिनेमात आलिया भट्टने सेहमत खानचे पात्र साकारले आहे.
6/6

स्वदेश (Swades) : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' हा सिनेमा आहे. नासामध्ये कार्यरत असलेल्या मोहनच्या आयुष्यावर सिनेमा भाष्य करतो. सिनेमात शाहरुख खानने मोहनची भूमिका साकारली आहे.
Published at : 26 Jan 2022 10:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























