एक्स्प्लोर
Aishwarya-Abhishek Anniversary: जाणून घ्या अभिषेक- ऐश्वर्या बद्दलच्या खास गोष्टी!
बॉलिवूड स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा करत आहेत..
(photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
1/9

बच्चन कुटुंब हे फिल्मी विश्वातील एक मोठे नाव आहे. या कुटुंबाशी संबंधित प्रत्येक बातमीवर लोकांची नजर असते.
2/9

अभिषेक बच्चनने जागतिक सौंदर्यवती ऐश्वर्या रायसोबत लग्न केले तेव्हा या लग्नाची देशातच नाही तर परदेशातही चर्चा होती. 20 एप्रिल 2007 रोजी या जोडप्याने लग्न केले.
3/9

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 'गुरू' चित्रपटात एकत्र काम केले होते.
4/9

या चित्रपटादरम्यान हे जोडपे एकमेकांच्या जवळ आले. याआधी दोघांनी 'कुछ ना कहो' आणि 'उमराव जान' सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.
5/9

टोरंटोमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान अभिषेकने हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला प्रपोज केले.
6/9

त्यानंतर भारतात परतल्यानंतर दोघांनीही आपलं नातं पुढे नेलं आणि त्याला लग्नाचं नाव दिलं.
7/9

लग्नानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी बोरा बोरामध्ये हनीमून साजरा केला.
8/9

ऐश्वर्यानेच एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, दोघेही फ्लाइटमध्ये होते, तेव्हा अचानक एअर होस्टेस ऐश्वर्या रायकडे आली आणि तिला 'मिसेस बच्चन' म्हटले. हे ऐकून अभिषेक आणि ऐश्वर्याला धक्काच बसला आणि त्यांनी लगेच एकमेकांकडे पाहिले.
9/9

थोड्या वेळाने दोघेही जोरात हसले. ऐश्वर्याने सांगितले की, 'मिसेस बच्चन' ऐकल्यानंतर तिला अचानक जाणवले की तिचे लग्न झाले आहे. (photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
Published at : 20 Apr 2024 11:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत



















