Best Score Academy Award : नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल साँग्स या गटात नामांकन मिळालं आहे.
2/8
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी आरआरआर या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. यामधील नाटू नाटू हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
3/8
या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकले आहेत. आता या गाण्याला ओरिजनल साँग्स या गटात ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.
4/8
एसएस राजामौली यांचा आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या
5/8
या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाची भूरळ पाहायला मिळाली होती.
6/8
यातील गाण्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. अवतार चित्रपटाचे निर्माते जेम्स कॅमरुन यांनाही हा चित्रपट आवडला होता. त्यांनी राजामौली यांचं कौतुक केले होते.
7/8
नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.
8/8
नाटू-नाटू या गाण्याला नामांकन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.