एक्स्प्लोर
Miss Universe 2023 : कोण जिंकणार मिस युनिव्हर्सचा मुकुट? दिविता रायकडे भारताचे प्रतिनिधित्व
Who is Divita Rai : भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे.
Miss Universe 2023 Who is Divita Rai
1/13

Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स स्पर्धेची (Miss Universe 2023) आज अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व दिविता राय हिच्याकडे आहे. (PC : DivitaRai/instagram)
2/13

मूळची कर्नाटकची असलेली दिविता राय सध्या मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत 86 देशांच्या सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत.(PC : DivitaRai/instagram)
3/13

अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहरामध्ये 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) पार पडत आहे. (PC : DivitaRai/instagram)
4/13

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यंदा मिस युनिव्हर्सचा मुकुट कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. (PC : DivitaRai/instagram)
5/13

भारताच्या सुष्मिता सेन (Sushmita Sen), लारा दत्ता (Lara Dutta) आणि हरनाज संधू (Harnaaz Sandhu) यांनी हा मुकुट जिंकण्याचा मान मिळवला आहे. या तिन्ही सौंदर्यवतींनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.(PC : DivitaRai/instagram)
6/13

25 वर्षीय दिविता राय मूळची कर्नाटकची आहे. तिचा जन्म मंगळूरू येथे 10 जानेवारी 1998 रोजी झाला. (PC : DivitaRai/instagram)
7/13

दिविताचे प्राथमिक शिक्षण कर्नाटकमध्ये झाले असून तिने मुंबईच्या सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी शिक्षण घेतले आहे. (PC : DivitaRai/instagram)
8/13

दिविता राय व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते. तिला चित्रकला आणि संगीताचीही विशेष आवड आहे. (PC : DivitaRai/instagram)
9/13

दिविता रायचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात. वडिलांमुळे ती देशातील अनेक शहरांमध्ये राहिली आहे. (PC : DivitaRai/instagram)
10/13

दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला आहे. 2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती. (PC : DivitaRai/instagram)
11/13

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. (PC : DivitaRai/instagram)
12/13

भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)
13/13

भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)
Published at : 14 Jan 2023 11:37 AM (IST)
आणखी पाहा























