एक्स्प्लोर
Ravi Shastri ते Mahendra Singh Dhoni या अभिनेत्रींमुळे उडालेली क्रिकेटर्सची विकेट

Feature_Photo_2
1/9

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या अफेर्सबद्दल नेहमी चर्चा सुरू असते. जाणून घेऊयात काही क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींच्या लव्ह स्टोरीबाबत...
2/9

क्रिकेटर रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या नात्याची चर्चा 1980 साली सुरू होती. रवी शास्त्री आणि अमृता यांनी 1986 साली साखरपुडा केला, असल्याचे म्हटले जात होते. पण नंतर अमृताचे लग्न अभिनेता सैफ अली खानसोबत झाले.
3/9

अभिनेत्री दीपिका पादुकोणने अभिनय क्षेत्रामध्ये करिअरची सुरूवात जेव्हा केली तेव्हा तिच्या आणि महेंद्र सिंह धोनीच्या अफेरची चर्चा सुरू होती. पण धोनी आणि दीपिकाने त्यांच्या नात्याबाबात कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती.
4/9

2019 साली ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्या अफेयरची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर या दोघांनाच्या नात्याबद्दल अनेक लोक पोस्ट करत होते.
5/9

निधि अग्रवाल आणि केएल राहुल यांच्या अफेरबद्दल 2019 साली चर्चा सुरू होती. सध्या केएल राहुलसोबत अभिनेत्री अथिया शेट्टीचे नाव जोडले जात आहे.
6/9

एली इब्राहिम आणि हार्दिक पांड्या यांची जोडी देखील चर्चेत होती. ब्रेक-अपनंतर एका वर्षाने मुलाखतीमध्ये एलीने तिच्या हार्दिकसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते.
7/9

तमन्ना भाटिया आणि विराट कोहली हे एकमेकांना डेट करत होते, असे म्हटले जात होते. 2017 साली विराटने अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधली.
8/9

नगमा आणि सौरव गांगुली यांची भेट 1999 साली वर्ल्ड कप सामन्याच्या दरम्यान झाली होती. सौरव गांगुली यांचे तेव्हा लग्न झाले होते. अशी चर्चा होती की, नगमाला डेट करण्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनावर झाला होता.
9/9

अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंह यांची लव्ह स्टोरी देखील चर्चेत होती. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान युवराज आणि किम यांची भेट झाली होती.
Published at : 27 Oct 2021 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
