एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra State Film Awards : 57 व्या 'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार सन्मानित!
Maharashtra State Film Awards : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान..
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.. (Photo Credit : CMO)
1/12

नुकताच 57 व्या 'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा पार पडला. (Photo Credit : CMO)
2/12

वरळी येथील डोम, एनएससीआय येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता हा सोहळा पार पडला. (Photo Credit : CMO)
3/12

या 'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. (Photo Credit : CMO)
4/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पार्श्वगायक 'सुरेश वाडकर' यांना गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर पुरस्कार-२०२२' प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. (Photo Credit : CMO)
5/12

ज्येष्ठ अभिनेत्री 'हेलन' यांना सन २०२२ च्या 'स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. (Photo Credit : CMO)
6/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ दिग्दर्शक 'जे.पी. दत्ता' यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. (Photo Credit : CMO)
7/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' वर्ष २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक 'नागराज मंजुळे' यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Photo Credit : CMO)
8/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' प्रदान करण्यात आले. वर्ष २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक 'गजेंद्र अहिरे' यांना, वर्ष २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक 'रवींद्र साठे'आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Photo Credit : CMO)
9/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते 'स्व.रवींद्र महाजनी' (मरणोत्तर), वर्ष २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री 'श्रीमती उषा चव्हाण' आणि वर्ष २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री 'श्रीमती उषा नाईक' यांना प्रदान करण्यात आला. स्व. रवींद्र महाजनी यांच्या वतीने गश्मिर महाजनी यांनी तर उषा चव्हाण यांच्या वतीने विजय कोंडके यांनी मुख्यमंत्र्यांकडून हे पुरस्कार स्वीकारले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Photo Credit : CMO)
10/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते 'अशोक सराफ' यांना २०२३ साठीचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी निवेदिता सराफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. (Photo Credit : CMO)
11/12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती 'श्रीमती अरुणा इराणी' यांना सन २०२० या वर्षासाठीचा 'स्व. राज कपूर जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Photo Credit : CMO)
12/12

ज्येष्ठ अभिनेते 'मिथुन चक्रवर्ती' यांना सन २०२१ या वर्षासाठीचा 'स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (Photo Credit : CMO)
Published at : 23 Feb 2024 10:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























