एक्स्प्लोर

Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Bihar vidhansabha Result अतिशय मनापासून बिहारच्या जनतेचं आभार मानतो. बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे.

मुंबई : बिहारमध्ये (Bihar) भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं असून बिहार विधानसभेत आता एनडी आघाडीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळीही विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही बिहार विजयावर आनंद व्यक्त केला. त्यानंतर,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. 

अतिशय मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो, आभार मानतो. बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे. जे आकडे दिसत आहेत, त्यावरुन 2010 चा रेकॉर्ड तुटेल असा हा विजय झालेला आहे. मोदींवर बिहारच्या जनतेचं असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतंय, नितीश कुमार, चिराग पासवान असतील मांझी असतील, उपेंद्र कुशवाह यांच्यासह युतीला लोकांनी प्रतिसाद दिला.  

राहुल गांधींवर बोचरी टीका (Critics on rahul gandhi)

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार सुरू केलाय, त्याला जनतेनं उत्तर दिलंय.संवैधानिक संस्थांवर आरोप करणे, संवैधानिक मार्गाने चालणाऱ्या कारभाराला विरोध करणे, जनतेच्या मताधिक्याला विरोध करणे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअर आहे. राहुल गांधींनी व्होट चोरीचा मुद्दा काढला, त्यावर यात्रा काढली, नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करुन बघितला. पण, लोकांचा विश्वास हा मोदीजी आणि नितीशकुमार यांच्यावर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे. 

बिहार निवडणुकीत सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी, प्रोइन्कम्बन्सी दिसली, मागच्यावर्षी एन्टीइन्कम्बन्सी होती. त्यामुळे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 160 जागा जिंकू असं वाटत होतं, आम्ही त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.      

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? (Bihar vidhansabha election)

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये निवडणुका झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि नितीशकुमार हे एकत्र बसून घेतील. मुख्यमंत्री पदासंदर्भातील बोलण्याचा अधिकार मला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेळोवेळी अमित शाह यांनी अतिशय स्पष्टपणे त्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. आमच्या संसदीय समितीचा आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा तो निर्णय होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget