Written By : abp majha web team | Updated at : 25 Apr 2022 12:58 PM (IST)
(फोटो :bharti.laughterqueen/ig)
1/6
Bharti Singh Baby’s Photo : कॉमेडीयन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत.(फोटो :bharti.laughterqueen/ig)
2/6
मुलाच्या जन्मानंतर केवळ 12 दिवसांनी भारती कामावर देखील परतली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावे लागले. यावर उत्तर देताना भारती म्हणाली होती की, ती फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे.(फोटो :bharti.laughterqueen/ig)
3/6
कामातून वेळ मिळताच ती पूर्ण वेळ मुलासोबत घालवते. भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सध्याचा दिवसभराचा दिनक्रमही सांगितला आहे. आता भारतीने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर केला आहे.(फोटो :bharti.laughterqueen/ig)
4/6
या फोटोत भारतीने बाळाची झलक दाखवली असली, तरी त्याचा चेहरा दाखवलेला नाही. भारतीच्या नवजात बाळाला गुंडाळलेले आहे.(फोटो :bharti.laughterqueen/ig)
5/6
तिने बाळाला कुशीत घेतले आहे. हा क्युट फोटो भारतीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला भारतीने ‘लाईफ लाईन’ असं खास कॅप्शन लिहिले आहे.(फोटो :bharti.laughterqueen/ig)
6/6
भारती सिंह पहिल्यांदाच मातृत्वाचा आनंद घेत आहे. अद्याप तिने बाळाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. भारतीच्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झाले आहेत. बाळाचा चेहरा का दाखवला नाही, याचं कारण सांगताना भारती म्हणाली की, घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात बाळाचा चेहरा किमान 40 दिवस तरी दाखवत नाहीत, आणि मोठ्यांचं म्हणणं नेहमी ऐकलं पाहिजे. म्हणूनच आम्ही देखील याची वाट पाहत आहोत.(फोटो :bharti.laughterqueen/ig)