एक्स्प्लोर
Cannes 2024: गुलाबी-काळ्या फिश टेल गाऊनमध्ये कियारा अडवाणी राजकुमारीसारखी दिसते, फोटो पाहून चाहते घायाळ!
कियारा अडवाणीने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या रेड कार्पेटवर तिच्या लूकने सर्वांना वेड लावले.अभिनेत्रीच्या दुसऱ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Kiara Advani princess look
1/8

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी फ्रेंच रिव्हिएरामध्ये तिचा जलवा दाखवत आहे.
2/8

कियाराने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धमाकेदार पदार्पण केले. पहिल्या दिवशी तिने रेड कार्पेटवर पांढरा गाऊन परिधान केला होता, तर दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीने गुलाबी-काळ्या फिश टेल गाऊनमध्ये डिस्ने प्रिन्सेसचा लूक केला होता.
3/8

कियारा अडवाणीने यावर्षी कान्समध्ये पदार्पण केले. अशा परिस्थितीत तिच्या प्रत्येक लूकवर चाहते लक्ष ठेवून आहेत.
4/8

याआधी ही अभिनेत्री पांढऱ्या हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली होती, तर आता तिचा राजकुमारीचा लूक पाहून चाहत्यांची मनं भारावून गेली आहेत.
5/8

कियारा अडवाणीने रेड सी फिल्म फेस्टिव्हलच्या वुमन इन सिनेमा मेड गाना डिनरला हजेरी लावली होती.
6/8

अभिनेत्री हलक्या गुलाबी आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ऑफ-शोल्डर फिश टेल गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
7/8

अभिनेत्रीच्या गाऊनच्या मागे एक मोठा गुलाबी रंगाचा बो जोडलेला होता.
8/8

कियाराने तिचा डिस्ने प्रिन्सेस लुक डायमंड नेकलेसने पूर्ण केला. अभिनेत्री तिच्या स्टायलिश बन हेअरस्टाईलने जबरदस्त दिसत होती. (pc:kiaraaliaadvani/ig)
Published at : 20 May 2024 08:03 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग


















