Holi 2022 : होळी (Holi 2022) हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात.(photo:kareenakapoorkhan/ig)
2/7
मैत्री आणि बंधुभावाच्या या सणात लोक आपले वैर विसरून आनंदाने एकत्र येतात. बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत. (photo:kareenakapoorkhan/ig)
3/7
होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. पण, बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिला आधी होळी खूप आवडत होती, पण आता तिला रंगांचा तिटकारा आहे. ही अभिनेत्री आहे करीना कपूर (Kareena Kapoor Khan). (photo:kareenakapoorkhan/ig)
4/7
रीनाला आधी धुळवड साजरी करणे आवडायचे. मात्र, आता ती रंगांपासून दूर पळते. यामागचे कारण स्वतः अभिनेत्रीनेच सांगितले. तैमूरच्या जन्मानंतर त्यांच्या घरी पुन्हा धुळवड साजरी केली जात आहे. पण, असे असूनही करीना मात्र रंगांपासून दूर पळते. (photo:kareenakapoorkhan/ig)
5/7
एकेकाळी कपूर घराण्याची धुळवड एवढी प्रसिद्ध असायची की, प्रत्येकजण त्यावर चर्चा करताना दिसत होता. राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये होळी पार्टीचे आयोजन असायचे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी व्हायचे. तेव्हा, करीना कपूरला होळी खूप आवडायची. ती तिचे आजोबा राज कपूर यांच्या खूप जवळ होती. बालपणी त्यांच्यासोबत होळी साजरी करायची. मात्र, त्यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबात होळी साजरी झाली. (photo:kareenakapoorkhan/ig)
6/7
करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, संपूर्ण कपूर कुटुंबाला होळीच्या निमित्ताने राज कपूर यांची खूप आठवण येते. त्यांच्या जाण्यानंतर होळीचा उत्सव फिका पडला आहे. त्यामुळे सर्वजण अत्यंत साधेपणाने होळी खेळतात. (photo:kareenakapoorkhan/ig)
7/7
बॉलिवूडमध्ये राज कपूर यांची होळी सर्वात खास असायची. आरके स्टुडिओमध्ये, गेटजवळ एक मोठा तलाव बांधला जायचा, जो रंगांनी भरलेला असायचा. जो कोणी तिथे यायचा, त्याने आधी या रंगीत तलावात बुडून पुढे जायचे, अशी प्रथा होते. या स्टुडिओत दिवसभर गाणे, खाणे-पिणे सर्व काही जल्लोषात चालायचे. त्यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत करीना देखील यात सहभागी व्हायची. मात्र, राज कपूर यांच्या निधनानंतर करीनाने होळीच्या रंगांपासून स्वतःला दूर ठेवले. (photo:kareenakapoorkhan/ig)