एक्स्प्लोर
कंगणा राणौत आणि राज ठाकरेंच्या कन्येकडून शनी देवाला अभिषेक, दर्शन घेतल्यानंतर दोघींचा एकत्र सत्कार
Kangana Ranaut and Raj Thackeray daughter : कंगणा राणौत आणि राज ठाकरेंच्या कन्येकडून शनी देवाला अभिषेक, दर्शन घेतल्यानंतर दोघींचा एकत्र सत्कार
Entertainment
1/10

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने शनिशिंगणापूर येथे शनीच दर्शन घेऊन तेल अभिषेक केला आहे.
2/10

यावेळी कंगना राणावत यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे देखील उपस्थित होत्या.
3/10

खूप दिवसापासून शनीचे दर्शन घेण्याची इच्छा होती, पूर्ण विश्वात असं मंदिर नसून शनीची चांगली दृष्टी राहावी यासाठी प्रार्थना केल्याचं कंगना राणावत म्हणाली.
4/10

यावेळी शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने कंगना राणावत आणि उर्वशी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
5/10

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत.
6/10

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना शिवसेनेत आणि कंगणा राणौतमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला होता.
7/10

दरम्यान, सध्या राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे आणि कंगना राणौत एकत्र आलेल्या पाहायला मिळल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
8/10

स्वातंत्र्य दिन शनिवार आणि जोडून येणारा रविवार या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळ तसेच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
9/10

अहिल्यानगरचा शनिशिंगणापूर येथे देखील सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी दिसते आहे.
10/10

त्यातच श्रावण महिना सुरू असल्याने शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने शनिभक्त शनीदर्शन घेत आहेत...
Published at : 16 Aug 2025 06:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
























