बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा आतापर्यंत त्याच्या एक्स बायको सुसैन खानसोबतच्या (Sussane khan) घटस्फोटामुळे प्रचंड चर्चेत असायचा. त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणीही हृतिक फार कमी दिसत होता.
2/5
मात्र, नुकताच हृतिकचा असा एक अंदाज समोर आला आहे ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यामुळे हृतिक सोशल मिडीयावर पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय ठरतोय.
3/5
खरंतर, हृतिक रोशन आज अचानक त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी तो एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला.
4/5
यावेळी हृतिकबरोर एक मुलगी दिसली, जिचा त्याने हात धरला होता. आणि हाच लोकांच्या चर्चेचा विषय ठरला. खरंतर तेव्हा हृतिकबरोबर त्याच्या बहिणी पश्मीना आणि सुनैना देखील उपस्थित होत्या. सर्व एकत्र जेवायला गेले होते. पण, या मिस्ट्री गर्लने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
5/5
एका चाहत्याचे असं म्हणणं आहे की, ती मुलगी सबा आझाद (Saba Aazad) आहे. जी एक संगीतकार आहे. तसेच, तिने अलीकडेच नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा मुलगा इमादसोबत काम केले आहे. परंतु, असे असले तरी हृतिकच्या चाहत्यांना मात्र, हृतिक खरंच त्या मिस्ट्री गर्लला डेट करतोय का? याबाबत उत्सुकता आहे. (all photo: hrithik roshan/ig)